टाहो याचनेचा
टाहो याचनेचा
ती याचना करीत होती,
मदतीचा आर्त टाहो फोडत होती
आणि बेअब्रू होत होती
शेवटी जाळून टाकल्या गेली
पण श्वास खंडीत होण्यापूर्वी
ती मात्र समजून गेली की,
'देव', 'खुदा' किंवा 'गॉड' वगैरे
कुणीही असतील...
त्यांना आता सवय झालीय
कर्णकर्कश आवाजाची
मग तो याचनेचा असो की डीजेचा...
शेवटी मृत्यूच्या दारात पोहोचल्यावर
ती पूर्णतः अनुभूत झाली होती
कणाकणात व्याप्त असलेला
'देव', 'खुदा' वा 'गॉड' वगैरे
हा केवळ एक भ्रम आहे
मन रमविण्याचा...
पण आता दुःख आहे की,
हे सत्य प्रमाणित करायला
ती जिवंत कुठे आहे..!
