तरुणपणाची आई
तरुणपणाची आई
1 min
192
मुलांना आठवत नसते,
तरुणपणाची आई,
उन्हातान्हात,
झडी पावसाळ्यात,
राबराब राहणारा,
मुले जाणती होईस्तोवर,
आई होत गेलेली असते म्हातारी,
आता मुलांना वाटते,
आई अशी कशी,
आळशी, बिनकामाचा,
लगेच शकते, त्यांना माहीत नसते,
झाशीच्या राणीसारखे,
लेकराला पाठीला बांधून,
शेतात काम करतानाचे,
डोक्यावर ओझे घेऊन,
सरासर काम करणारी
आई ही आईच असते,
तिची बरोबरी कोणाला येत नाही.....
