तृप्त तू तृप्त मी
तृप्त तू तृप्त मी
1 min
213
तृप्त तू तृप्त मी अशा या जीवनी
संसाराचा रथ चाले जन्मोजन्मी
बाग संसारात नवचैतन्याची
फुले छान फुलतील वैभवाची
जोडी तुझी आणी माझी प्रेममय
नांदू विश्वासाने रे आनंदमय
साथ जन्माची देऊया विश्वासाने
राहू सुखी दोघे आपण जोडीने
ईश्वराची सेवा करू आयुष्यात
सुख प्राप्त मग मिळे जीवनात
भाव भक्तीचा ईश्वरी ठेवा मनी
तृप्त तू आणि मी आजन्म जीवनी
