तृणांकूर...
तृणांकूर...
1 min
135
भराभरा मी चालत होते
उन्हाच्या गं पारी
दमूनभागून बसले खाली
बघून झाडाची सावली
झाडाखाली बसले असता
तृणांकूर मला दिसले
बघत असता त्याच्याकडे
बघताच मला ते हसले
हसता हसता हलकेच बोलले
पण भारीच मोलाचे काही
अशी कशी रे तुम्ही माणसं
सोसत काहीच नाही
जातो कधी हा उन्हाळा
वाट पावसाची बघतो
पावसाची रिपरिप बघुनी
हिवाळाच चांगला म्हणतो
तृणांकूर मी इवलासा
हिवाळ्यात बहरुन जाई
उन्हाच्याही सोशीत झळा
वाट पावसाची पाही
किती तुडविती पायाखाली
तरी उभारून उठतो
माणूस नावाचा एकच प्राणी
फक्त स्वतःस हरवून बसतो
