तरच कळेल
तरच कळेल
कधी तप्त सूर्याला स्पर्शून तर बघ...
शितल चंद्राची छाया कळेल!
कधी समुद्राचा तळ गाठून तरी बघ,,
आकाशी झेप घेण्याची मजा कळेल!
कधी खोल दुख:सागरात जाऊन बघ...
सुखाची एक झलक काय ते कळेल!
कधी थरथरणारा हातात हात देऊन बघ..सळसळणारे रक्त काय ते कळेल!
कधी चंद्र तारे ओंजळीत घेऊन बघ...धरीत्रीच्या फुलांचा सुगंध दरवळेल!
कधी कल्पनेपलीकडचा विचार करून बघ..वास्तव काय ते लगेच कळेल!
कधी सीमेवरील जवान होऊन बघ...
मृत्यूला सामोरे जाणे काय ते कळेल!
कधी चौकटीबाहेर राहून बघ...
मर्यादा काय ते कळेल!
हृदयातून प्रेम करून बघ...
तडकलेले हृदय काय ते कळेल.!
कधी प्रकाशात डोळे बांधून एक दिवस बघ..अंधांचे विश्व काय ते कळेल!
कधी जीवनापालीकडचे जीवन जगून बघ..जीवन जगणे काय ते कळेल!
मित्रा...म्हणायला सर्व सोपे आहे...
जरा स्वत:ला एकदा विचारून तरी बघ,!
जमलं नाही यातलं काहीच तर, निदान मदतीचा हात देणं तरी कळेल.
