तप्त उन्हाच्या झळा
तप्त उन्हाच्या झळा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
22.1K
सू्र्यराज आले माथ्यावर,
केला त्यांनी खूपच कहर,
तप्त तळपण्याची त्यांना लहर,
दिली पाठवून उन्हाची झालर.
तप्त उन्हाच्या झळा,
सोसवेना हा उन्हाळा,
बसती चटके पण फार,
होऊ लागले सगळे बेजार.
तळपत्या उन्हात झाली ,
जीवांची खूपच तगमग,
साऱ्याजणांची सुरू झाली,
विसावा शोधावया लगबग.
प्राणी, पशुपक्षी लागे निवारा शोधू,
मिळतो कुठे गारवा तेही लागले पाहू,
झाडवेलीचा मिळता सहारा,
विसावून तेथे होई उन्हाची धग कमी जरा.
तप्त उन्हात झळ सोसताना,
विचार डोकावते मनात,
झाडे लावा, झाडे जगवा,
नाही तडपावे लागायचे उन्हात.