तपोभंग
तपोभंग
1 min
245
ज्यांच्या व्यंगचित्रांनी हसला, अवघा महाराष्ट्र झकास
सर्वांच्या राहतील स्मरणात, कायम सबनीस विकास
हुकुमत होती रेषांवर, कुंचला किमया करीत असे
लोकांच्याच मनातले, चित्रात रंग भरीत असे
कधी मस्त चिमटा काढला, कधी कोपरखळी
ढोंग-लबाडी उघडी पाडली, अचूक वेळोवेळी
अग्रलेखाचा विषयही, चित्रात मांडण्याची हातोटी
पन्नास वर्षे जिंकलात, गुणवत्तेने कसोटी
उंचीवर नेले कलेला, जरी असली ’व्यंग’
अचानक गाठून मृत्यूने, केला तपोभंग!
