तो येतो तेव्हा
तो येतो तेव्हा
1 min
266
नाही लिहायचं ठरवलं तर
पाऊसही बरसत नाही
जायची घाई नसते..मग
थोडावेळ येवून सुचवावं त्याने काही
कागद पेनही हिरमुसतो
त्याच्या उशीरा येण्याने
नुसतचं भरून येतं आभाळ
जशी गोठावी पेनातली शाई
कधीकधी हळहळ वाटते
कुठेतरी भलतीच कडे बरसतो
मला कळते सारे हळुवार
माझ्या प्रवाहात तो कोसळत नाही
तरी मन निमुटपणे पाहतं
पुन्हा त्याच अथांग आकाशात
दरवळतो.. लिहीताना तो ही जरासा
येतो तेव्हा मला कळतसुद्धा नाही ....!!!!
