तो वार.
तो वार.
आठवतो तो लहानपणी चा रविवार..
असायचा शाळेला सुट्टी चा वार ....
उशीरा उठण्याचा असायचा माझा घाट...
आईपण नाही उठवायची मला फार...
उशीरा उठुन आईने केलेल्या नाशत्यावर असायचा हल्ला.
मग माझी स्वारी निघायची खेळायला ....
थकुन आलं की मिळायचं गरम पाणी आंघोळीसाठी..
तो पर्यंत आई स्वच्छ धुवून घेई गणवेश शाळेसाठी...
मग लगेच आई ताट घेई...
चटकदार पदार्थ खाण्याची असायची माझी घाई...
जेवल्यानंतर सुस्ती येई ....
गुपचूप मी झोपुन जाई...
संध्याकाळ चा चहा नंतर बाबा गणेशाला ईस्त्री मारीत ..
आई मला मग गृहपाठाची आठवण करून देई....
मग मात्र मन निराश होई...
एकच मनात प्रश्न येई ....
हा रविवार का संपतो लवकर बाई ...
