STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Others

3.4  

दिपमाला अहिरे

Others

तो,ती आणि पाउस!!!

तो,ती आणि पाउस!!!

1 min
206

रीमझीम असो की, गडगडाटी असो

पाऊस आला म्हणजे त्याला तिची आठवण येणारच..


कारण तीच्या शी त्याची गाठभेट झाली की

असाच बरसायचा पाऊस..


आजही तिच्याच आठवणींच्या भुतकाळात घेऊन

जातो त्याला हा बरसणारा पाऊस..


तीची त्याची पहिली भेट कॉलेजचे गेट

आणि जुन महिन्याचा तो पहिला पाऊस..


कॉलेजच्या कट्ट्यावर दोघेही गप्पांमध्ये रंगलेले 

अचानक बरसायचा हा पाऊस..


धावत जाऊन. कॅन्टीन गाठायचं . गरमागरम वाफाळता चहाचा कप ,तिचे गोड बोल

आणि हवाहवासा वाटायचा मग हा रीमझीम पाऊस..


ठरलेली दोघांची भेट. पण या दोघांमध्ये

नेहमीच तिसरा बनायचा तो अचानक पडलेला पाऊस..


तिचं बोलणं, त्याचं ऐकणं, प्रेमाच्या आणाभाका

जनु दोघांच्या भेटीचे प्रतिकं होता हा पाऊस..


आपण भेटल्यावर हा आता बरसणारच हे दोघांनाही आता कळले होते. दोघांनाही आपला वाटणारा पाऊस..


आजही कोसळतो तो धुवांधार पण

त्याच्याकडे उरल्यात तिच्या फक्त आठवणी

आणि आज अनोळखी आहेत तिघेही

तो,ती आणि पाउस!!!!



Rate this content
Log in