तो पाऊस
तो पाऊस
1 min
326
पडता पहिला तो पाऊस
मयूर अवनीवर नाचला
चिंब आसमंत जलधारांनी
पाऊस अंगणात साचला
व्याकुळल्या चातकाची
भागली असेलच तहान
उडून गेला तो नभांतरी
वरूणराजा किती महान
भेगाळलेल्या या भुईला
शिडकावा जलतुषारांचा
मृदगंधाचा दरवळ सुटला
बळीराजाच्या शिवाराचा
वृक्षारोपण करण्याची
घेतलीय मानवाने हमी
जलधारांची वसुंधरेवर
होणार नाही आता कमी
भिजलेत सारे पशुपक्षी
पहिल्या या जलधारांनी
आनंद गगनात मावेनाच
पंख फडफडले साऱ्यांनी
