STORYMIRROR

आनंद घायवट

Others

3  

आनंद घायवट

Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
264

तुला बरसतांना पाहून आज

जीवाला बघ मिळतोय रे उसासा।।१।।


कष्टतो जरी अपार बळीराजा

तरी भासे कोरडा तयाचा घसा।।२।।


डोळे नभाकडे लावतांना व्याकुळलेला

वाट पाहून पाहून मुकला बघ रे श्वासा।।३।।


सृष्टीचा असुनही तू भाग्यविधाता

होतोस सांग इतका निष्ठुर कसा।।४।।


चुक माफ करून जगविण्या सृष्टीला

बरस जपण्या सुजलाम सुफलामतेचा वसा।।५।।


आटले डोळ्यातील पाणी सारे म्हणून तरी

दुष्काळ पडलाय तिथं धायमोकलून रड जरासा।।६।।


मानवाच्या अट्टहासापायी घडले दुष्कृत्य तरी

चुका पोटात घालून सगळीकडे बरसावे पावसा।।७।।


Rate this content
Log in