STORYMIRROR

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
282

व्याकुळलेली वसुंधरा 

पाण्याच्या थेंबाने सुखावली

पावसाच्या बरसण्याने

वृक्षवेली बहरली


पहिल्या या पावसात प्रिया

तू अन् मी भिजूया

छञी हवी कशाला

चिंबचिंब होऊया


बेधुंद बरसणा-या सरीत या

आसमंती इंद्रधनूची स्वारी

मृदूगंधाने गंधाळली धरा

सुगंध पसरे सभोवरी


किती मजा असते

पहिल्या पावसात भिजण्याची

सोबत असावी फक्त 

वाफाळलेल्या चहाची


खास पदार्थ पावसाळ्यातला

गरमगरम भजे कुरकुरीत

चहाबरोबर खाल्ले तर

आनंद करतात द्विगुणित


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ