STORYMIRROR

Manda Khandare

Others

3  

Manda Khandare

Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
11.7K

तुझ्या माझ्या 

भेटीतला तो पाऊस

आज ही येतो

कधी कधी भेटीला..... 

सहज आलो म्हणून

विसावतो ओसरीला. 

छेडतो कधी कधी

तो गीत मिलनाचे..... 

डोळ्यतील पावसाचे

कधी विराहाच्या वेदनांचे

कधी हरवतो स्वत:तच... 

तर कधी भूलवतो मला ही

कधी दु:खाचे मोती वेचीत

तो खेळ मांडतो... 

तर कधी हळूच तालांवर

शब्दांच्या माळा गुंफ़तो.....

मी सांगते त्यास.....

मी सांगते त्यास

विसर झाले गेले सारे

नको छेडूस.... ते जुने तराणे

शोध काही नवे बहाणे....

नको गाऊ तेच गाऱ्हाणे

तर म्हणे नाही ज़मत मला.... 

नाही ज़मत मला, 

तुझ्या सारखे वागणे, 

ओठांवर हसु खेळवत

मनाच्या खोल जख्मांमधे

विहळणे......... 

दम्भिकपणे जगणे..... 

अन् झेलून अवहेलना

आतच गुदमरने. ...... 

मी आज ही मुक्त पणे बरसतो

काल तुझ्या सोबत......... 

तर आज......... 

खारे पाणी होऊन....... 

तुझ्या शिवाय बरसतो.... 


Rate this content
Log in