STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
236

आठवणींच्या धुक्याला अलगद दूर सारून

भुतकाळात पाहिले मी जरासे डोकावून।।


रिमझिम रिमझिम बरसणारा पाऊस मला दिसला

माझ्याकडे पाहून गालामध्ये हसला।।


शाळेतल्या पन्हाळीचं पाणी मला दिसलं

भिजून घे जरा तुही, माझ्याशी ते बोललं ।।


जरा दूर पाहिल्यावर एक छत्री दिसली

तिच्यामध्ये आम्ही दोघी, मैत्री आमची हसली।।


येरे येरे पावसा म्हणत, ओलेचिंब भिजताना

मलाच मी पाहिले तालावर नाचताना ।।


पावसाचे थेंब जेव्हा अंगावर आले

सुखद अशा स्वप्नातून मला जागे केले ।।


आता फक्त पाहते पाऊस घराच्या खिडकीतून

मौज घेते त्याची माझ्या चाकोरीतच राहून ।।


आठवे मला तो पाऊस माझ्या बालपणीचा

मनालाही ओलेचिंब करणारा-या सरींचा ।।


मनाच्या संदुकात दडवून ठेवलयं त्याला

माझ्यासारखाच अजुनही आठवतो का तुम्हाला? ।।


Rate this content
Log in