STORYMIRROR

Piyush Lad

Others

3  

Piyush Lad

Others

तो पाऊस मजला..!

तो पाऊस मजला..!

1 min
417

एका वळणावर मजला तो सहज भेटला होता

मी भिजवून राहीन तुजला, जिद्दीस पेटला होता


ओझरत्या लहरींमधुनी तो धरेस नटवित होता

तो माझ्या अश्रूंमधुनी स्वतःला सजवीत होता


आयुष्य त्याचेही होते क्षणभंगुर त्या अश्रूंसम 

ह्या खोट्या दुनियेमध्ये शाश्वतता शोधित होता


मी पुसले होते त्याला तव रहस्य आनंदाचे 

डोळ्यांवर टचकन पडुनी तो फार बोलला होता...!


Rate this content
Log in