STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

2  

Manisha Wandhare

Others

तो हासरा चंद्र...

तो हासरा चंद्र...

1 min
86

तो हासरा चंद्र...

शब्दांने तोललेले , मन शब्दांचेच होते ,

स्पर्श हळवा मायेचा , लडे शब्दांचेच होते ...

तो हासरा चंद्र ,शिरतो नभाच्या कुशीत ,

पाहूण लाजणाऱ्या चांदण्यांचे , स्वप्न लाजरे होते ...

तो शहारा सुकुमार , अंगावर उमटतो ,

फुलांच्या तनुचे , सुंगध मधुर होते ...

तो मधुमास गोड , प्रणय रचितो हळूवार ,

पावसांच्या सरीचा , अंदाज खट्याळ होते ...

अत्तरांचे तुषार ,शिपंडता अंगावर ,

सुवास वेडा प्रितीचा , श्वास गुंतले होते ...

शब्दांने तोललेले , मन शब्दांचेच होते ,

स्पर्श हळवा मायेचा , लडे शब्दांचेच होते ...


Rate this content
Log in