तो आणि मी ...
तो आणि मी ...
तो मला अन मी त्याला बघत होती
त्याला बघायची एक सवय लागली होती
त्याला बघितल्या वीणा सकाळ होतच नव्हती
सर्वात आधी मला तो दिसावा म्हणून
पहाटे मी अलार्म लावून लवकर उठत होती
मी त्याला रोज बघत होती....||ध्रु||....
तो मला अन मी त्याला बघत होती
एके दिवशी तो मला दिसलाच नाही
म्हणून मी इकडे तिकडे त्याला शोधीत होती
पण तो मला कुठे दिसतच नव्हता
मी नाराज होवून तिथेच बसून होती
मी त्याला रोज बघत होती...||१||...
तो मला अन मी त्याला बघत होती
दुसऱ्या दिवशी पुन्हा मी त्याला
बघायला लवकर उठली
बघते तर काय तो कुठेच नाही
तेव्हा कळले की आता तो
अधून मधून केव्हातरी दिसत जाईल
कारण पावसाळ्याची सुरवात झाली होती
तो दुसरा तिसरा कोणी नसून सूर्य होता
मी त्याला रोज बघत होती...||२||...
