तलाश
तलाश
1 min
273
z
मुक्या माराची वेदना मुकी जीवघेणी
अश्रू कोरडे कोरली मनी दुःख लेणी
ठणकते कळ जीव झाला वेडापिसा
हुळहुळत्या जखमा अश्वत्थामी वसा
संपता अंमल औषधी घेरते धून
असह्य वेधाचा वार चुकून अजून
अस्वस्थ, बेचैन, अशांत तन नि मनी
सांपडेना रामबाण दवा संशोधनी
-बाबू फिलीप डिसोजा
