तिसरी घंटा
तिसरी घंटा
1 min
312
आयुष्याचे रंग उधळणारा रंगमंच, पडदा उघडला तसा जन्माला आलो
तयार आहेत सगळेच पैलूपंच, पाहून आपलेच रसिक धन्य झालो
सुरू झाला मग अंकांचा खेळ, आणि पात्रांची तळमळ
अवस्थेला पडतील कितीही पीळ, रंगभूमीला आहे आईचा दरवळ
चढत गेले अंक, तसा शेवट येऊ लागला
बालपण, पौगण्ड, तारुण्य, म्हातारा अंत जरा भासला
आता संपलं पडदा पडणार, म्हणून थोडं दुःख होतं
सरतेशेवटी प्रयोगच तो, दुसराही येणार माहीत होतं
गर्क होते सगळेच कलाकार रसिक, कलेच्या प्रेमात
अचानक तिसरी घंटा वाजेल याच काळोखात
