STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

तिळगुळ घ्या

तिळगुळ घ्या

1 min
544

नव नवर्षाचा सण पहिला, 

मकर संक्रांतीचा आज,

पतंग आशेचा भिडू दे नभी,

कटू दे संकटांचा माज!


कृषी संस्कृतीचा महिमा 

परंपरा अशीही भारतात,

सौभाग्यवती वाण देती, 

बोर, सोलाणे सुगडात!


शुभ काल हा सुरू झाला, 

धनूतून मकरात संक्रमण,

ऊर्जा मिळे समस्त सृष्टीला, 

होता सूर्यदेवाचे उत्तरायण!


दान तिळाचे पुण्य लाभते, 

साक्ष देती इतिहास, पुराण,

हलव्याचे दागिने नववधूस,

छोट्यांस तिळवण, बोरन्हाण!


चला उत्सव करू साजरा,

गोडवा मनातला अखंड वसो,

राग द्वेष सारा पाक होऊ दे,

तिळमात्र मनी आठवण असो!


तिळ व गुळाचे साहित्य घेऊ,

गोडवा मनातला पाक ओला,

वळू अखंड नात्यांचे लाडू! 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!


Rate this content
Log in