Laxmidevi Reddy

Others


3  

Laxmidevi Reddy

Others


तिला जगू द्या..

तिला जगू द्या..

1 min 172 1 min 172

लहानपणी आईच्या पोटी जन्मले,

बाबांचे हात पकडून चालायला शिकले,

प्रत्येकक्षणी आईने प्रेमाने घास भरवले,

प्रत्येकक्षणी ज्ञानाचे धडे प्रत्येक व्यक्तीकडून शिकले.


थोडे मोठे होता शाळेत जायला लागले,

जगात वावरायच कस शाळेने शिकवले,

पावलोपावली दुनिया समजत गेले,

बसमधून जाता येता लोकांची नियती काय असते हे शिकले.


लोकांना का समजत नाय त्यांना पण आई बहिण आहे,

वाईट नजरेने जे बघतात त्यांना का लोक शिक्षा देत नाही,

आपण का या गोष्टीसाठी पाऊल उचलत नाही,

कोणीतरी पुढाकार घेतला तर हे थांबल्याशिवाय राहणार नाही.


मुलगी म्हणून जन्मलो म्हणजे गुन्हा केला,

मुलीला का कोणी स्वतंत्र देत नाही,

मुलीने तिच्या मनासारखे का वागू नये,

मुलगी ही एक वस्तू मानणे लोक का सोडत नाही.


या सगळ्या गोष्टींचा विचार एकदा तरी करा रे,

प्रत्येक मुलीला बहिणीसमान माना रे,

आपली बहिण पण तिच्या जागी असू शकते असा विचार करा रे,

तुमच मन तुमचे विचार एवढच बदला रे.


Rate this content
Log in