तीन पाने
तीन पाने
एक पानी जन्म झाला
गुळ फुटाणे वाटावी।
तोंडी ती साखर घाला
कुर घुघर्या वाटावी।।धृ।।
खेळीमेळी चढाओढी
डुगडुग रे, चालावी।
राज्य ये उतरे घोडी
पालखंड ती मांडावी।।१।।
दाटी मुटी मुळी मुळी
खरे खोटी ती रडावी।
रडता रडता गाली
गालातच रे,हसावी।।२।।
बाज्यासंगे ती बासरी
लोटगाडा ती ओढावी।
गम्मत जम्मत न्यारी
संगीत बुट घालावी।।३।।
मौज मजा बालपणी
यात्रा जत्रा आठवावी।
कुमार अभ्यास म्हणी
प्रोढी संसारी धुवावी।।४।।
ही ठरती दोन पाने
दो हाताने ती लुटावी।
सुपात वा ती जात्यात
हसती मोती असावी।।५।।
फेरी वारी तीन पानी
भरजरी ती असावी।
ना लसावी ना मसावी
बेरजेची ती असावी।।६।।
ऊँ नमः नमः शिवाय
ऊँ "ऊँ "जन्मवेळ साही।
"नमः" हे जगणे दावी
मृत्यु"शिवाय" "शिव" ही।।७।।
ऊँ नमः नमः शिवाय
"राम राम" सत्य वाही।
"जीवन "हे "तीन"पानी
जगणे हे "राम" ग्वाही।।८।।
