तीन कोन
तीन कोन
1 min
173
तीन कोन
बघायला गेलं तर ते एकमेकांसाठी
कोण?
अथांग आकाश
दोन ढगांनी विभागलेला तो
ते दोघं
की इतक्या सगळ्यात
एकांतात असलेला तो बाक....
पिवळ्या प्रकाशात
न्हाऊन निघालेल्या
त्यांच्या सावल्याही
वेगळ्याच कोनात गुंफलेल्या....
दोन कायम एकत्र
आणि एक नेहमीच एकटी
त्याला निदान मिळाली विभागणी
आणि आकाशाला अनंत मोजणी
पण एकात्रपणाच्या एकटेपणातही
आहे की असून नसलेली सोबत
किवा नसूनही कायम असलेला सोबती....
#त्रिकोण
#चौकोन
#भावनांचीभूमिती
