तीन एप्रिल सांज
तीन एप्रिल सांज
1 min
199
शुभंकरोती कल्याणम्
आरोग्यम् धनसंपदा
नित्य पाठ ठरलाय
तेजाचा वसाच घेतलाय....
शुक्रवारच्या सांजेला
हे आवर्जून सांगावे वाटते
देशासाठी प्रत्येकाचे
काळीज आपोआप फाटते....
सर्वात प्रथम देश
हे रक्तातच भिनलेले आहे
देशा साठीच जीणे हे
आधीच ठरलेले आहे...
देश माझा मी देशाचा
भाव मनी रुजला आहे
देशासाठी प्राण आम्ही
हातावरच घेतला आहे...
एक एक दिवा पेटवू
तेजाने सारे आसमंत व्यापू
भारतमातेच्या रक्षणार्थ
कोरोनाला चांगलाच चोपू...
घरात आंनदाने राहू
बाहेरच्या बाहेरच त्याला संपवू
दिवे तेजाचे नक्की पेटवू
कोरोनाला कायमचा हटवू....!
