तीळगूळ
तीळगूळ
1 min
132
शर्करेच्या संयोगाने सजतो तीळाचा हलवा ।
सांगतो संक्रांतीला स्नेहाच्या बागा फुलवा॥
मैत्रीचे बीजांकूर रोवून सौहार्दाचे सिंचन व्हावे।
मायेच्या मृद्गंधामधुनी प्रीतीवेलीस जीवन द्यावे॥
द्वेषाचे तृणांकूर तोडा, भयाचा पाचोळा झाडा।
वैषम्याची, विद्रोहाची, विकृतलेली झुडपे पाडा॥
संक्रमणाचा काळ असे हा; नवचैतन्य येई उदया।
तीळगुळाच्या मधुर वाणीने एकत्वाचे सूत्र गुंफूया
