ती
ती

1 min

255
रणांगणावर शत्रूला लढा देणारी
राणी लक्ष्मीबाई ती
रणरागिणी ती
थोर लढवई ती
स्वराजाचे संस्कार देणारी
शिव माता जिजाऊ ती
कणखर माता ती
संस्काराची जननी ती
स्त्रीशिक्षणासाठी लढा देणारी
ज्योतिबा फुलेंची सहचारिणी सावित्री ती
खरी सोबती ती
पतीची सावली ती
रोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य ओतणारी
जगद्माता मदर तेरेसा ती
निःस्वार्थ सेवेची प्रतीक ती
जगाची जननी ती