ती...
ती...
1 min
12K
ती न बोलणारी पण बरंच काही सांगणारी
घराला शोभा आणणारी
बाहेरच्या खट्याळ वाऱ्याला घरात खेळवणारी
घराबाहेरील वातावरण टिपणारी
गप्पा गोष्टींची देवाणघेवाण करणारी
कधी प्रेमाची चाहूल लावणारी
अशी ती न बोलणारी
बसमध्ये तीला मिळवण्याचा असतो अट्टाहास
ती मिळाली की सुखकर होई प्रवास
काळानुसार ती ही बदली
लाकडी ते आता फॅन्सी ग्लासमध्ये ती सजली
ती काही न सांगता खुप काही शिकवणारी
अशी जिवाभावाची ती खिडकी
