STORYMIRROR

Somesh Kulkarni

Others

3  

Somesh Kulkarni

Others

ती सध्या काय करते?

ती सध्या काय करते?

1 min
43


रस्त्यानेच जाताना दिसली म्हणून दिला मी तिला आवाज

नशीब ओळख दिली तिने म्हणाली, कसा काय भेटला आज?


तिनं मागवली काॅफी मी मागवला चहा

म्हणणार होतो आलीच आहेस तर चार दिवस इथंच राहा


कशी आहेस विचारल्यावर हसली गालातल्या गालात

तिची अपेक्षा एवढीच होती मी विचारु नये काही खोलात


तिनंही विचारलेच उलटसुलट प्रश्न नको असतानाही

धांदरटपणे याहीवेळी उत्तरं दिली मी काहीबाही


जुजबी बोलणं संपल्यावर तिनं मैत्रिणीला केला फोन

आजच निघणार परत इथं थांबतंय कोण?


मजेत होती ती तिच्या विश्वात एकंदरीत

मीच बसलो भावना व्यक्त करायला शब्दांची जुळवाजुळव करीत


पुढं बोलणार होतो आणखीही बरचसं, पण तिला झाला होता उशीर

बोलायलाच राहिलं नाही काही पाहून माझा सुटत चालला होता धीर


सरतेशेवटी गवसलं उत्तर मी तिला दिले धन्यवाद

बुद्धीपर्यंत पोहोचत नाही दरवेळी मनाची साद


Rate this content
Log in