STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

ती म्हणाली...!

ती म्हणाली...!

1 min
503

ती म्हणाली....!

आज शुक्रवार

तो ही कोल्हापूरातला

साक्षात महालक्ष्मीच्या

करवीर नगरीतला

जणू

सुवर्ण कांचन योग

गोड गुलाबी थंडी

मोहक लुब्रा गारवा

त्यात गरम गरम चहा

हा हा हा किती छान

क्षण भरच आनंद टिकला

आणि

कानावर फर्मान आले

आंघोळ आटपा

एकदा देवांनाही

आज स्नान घडू दे...!

म्हंटले चला

दिवसाची सुरुवात तरी

चांगली झाली

पटकन मोहरी गाठली

बादली सारली

आणि

नळ चालू केला..!

हात पुढे करून पाहतो तर काय

बर्फ़ाच्या कांड्या

पातळ होऊन फरफर आवाजाने

जोरात सरकत होत्या..

मूढच गेला आणि मी टेरास गाठला

तशी पाण्याची टाकी

सूर्याला विनवीत

ध्यानस्थ झाली होती

आणि

जणू म्हणत होती

अरे सूर्य नारायणा

आता तरी थोडी कृपा कर

ऊर्जेचा स्रोत पाठव

बघ ना तो ओरडा खातोय

आणि माझ्या कडेच

आशेने पाहतोय....!

तसा बेरकी सूर्य हसला

आणि म्हणाला

थंडीतला आळस थोडा तरी भोगू दे

आज तरी त्याला

वेळाने आंघोळ करू दे....!

सुप्रभात...!


Rate this content
Log in