ती माझ्यावर प्रेम करते की नाही
ती माझ्यावर प्रेम करते की नाही
कसं ओळखू, ती माझ्यावर
मरते की नाही
माहित नाही, ती माझ्यावर
प्रेम करते की नाही ||0||
नकार तिचा तर नक्की होता
माझ्या प्रपोझ ला
रस्त्याची धूळ लाभली होती
मी दिलेल्या रोझ ला
कसं ओळखू, ती तिच्या निर्णयावरून
फिरते की नाही
माहित नाही ती माझ्यावर प्रेम करते की नाही ||1||
प्रेम तर जीव तोडून केलंय तिच्यावर
हे ती जाणते
तरीही चेहऱ्यावर सतत उदासीन
भाव ती आणते
कसं ओळखू या शीतयुद्धात
ती हरते की नाही
माहित नाही ती माझ्यावर प्रेम
करते की नाही ||2||
दूर गेलीय ती माझ्यापासून
कधीतरी परत येईल
कधीतरी प्रेमाने मिठीत मला
अधीरतेने घेईल
कसं ओळखू जीवन माझं
बहरते की नाही
माहित नाही ती माझ्यावर प्रेम
करते की नाही ||3||
ती नाही आली तरी माझं प्रेम
कमी होणार नाही
जग माझं संपेल तिच्या अभावाने
नाही जाणार तिचं काही
कसं ओळखू माझी प्रेमनौका
आता तरते की नाही
माहित नाही ती माझ्यावर प्रेम
करते की नाही ||4||
तीही माझा विचार करतेय
मन साक्ष देतंय
आशेच्या दुनियेत मला
पुन्हा पुन्हा नेतंय
कसं ओळखू ती माझ्यासाठी
झुरते की नाही
माहित नाही ती माझ्यावर प्रेम
करते की नाही ||5||
काय तिच्या मनात आहे
अजून समजत नाही
अशी का वागते ती
खरंच उमजत नाही
कसं ओळखू तिची भावना
विखुरते की नाही
माहित नाही ती माझ्यावर प्रेम
करते की नाही ||6||
माझ्या प्रती तिच्या मनी
प्रेम जागेल का
कधीतरी प्रेमाने ती
माझ्याशी वागेल का
कसं ओळखू मनात तिच्या
प्रीत मुरते की नाही
माहित नाही ती माझ्यावर प्रेम
करते की नाही ||7||
