ती 'कविता' असते..
ती 'कविता' असते..
1 min
237
दरवळते ती आता
कायम माझ्या मनी
बोलते, सांगते गूज
हळूच माझ्या कानी
मैत्री तिची शब्दांशी
सखी तिची लेखणी
होऊन कागदाशी एकरूप
करते तयाशी दोस्ती
येते जेव्हा ती
सुगंध मोहक येतो
प्रत्येक शब्द स्वतःला
सुगंधात गुंफून घेतो
दरवळते ती लेखणीतून
गुंफते शब्दांची माळ
बकुळीप्रमाणेच सुगंध तिचा
सुगंधित तिचा सहवास
वसते ती पद्यात
मनाला ती भावते
मनातलं गूज जाणणारी
ती 'कविता' असते..
