STORYMIRROR

Prashant Shinde

4  

Prashant Shinde

ती आणि ती वेळ..!

ती आणि ती वेळ..!

1 min
687


ती आणि ती वेळ...!


ती चन्द्र कोर

ती चांदणी

आग्न्येयेस मज दिसली

खरं सांगू

आठवण तिची झाली

ती पहाटेची गोड थंडी

अंगात खादीची बंडी


त्यात प्रेमास बंदी

पण वेगळीच धुंदी

मित्र छंदी फंदी

मोजायचे छातीची रुंदी

म्हणायचे पहाटे पहाटे


लाव जरा नीट गुंडी

तेवढ्यात वेळ चुकायची

चांदणी दूर पळायची

नजरे आड व्हायची

कॉलेजला जायची

वेळ जवळ जवळ व्हायची

फारच ताप द्यायची

गेले गेले ते थंडीचे


सुमधुर क्षण भूर्रकन उडून

आणि आली आत्ता

श्वानाची स्वारी पुढून

वाटलं वाकडी शेपूट

वासाड्यांची कोण सरळ करणार..?


म्हंटल जावं कडेकडेनं

आवाज न करता

गप्प गुमान निमूट

नाही दुसरं

आपण तरी काय करणार....?


Rate this content
Log in