ती..आहे म्हणून..!
ती..आहे म्हणून..!
1 min
287
ती कस्तुरीचा सुगंध
ती सळसळता आनंद
ती वाऱ्याची हळूवार झुळूक
ती मायेचे कणखर रूप
ती चमकणारी वीज
ती फुलातील बीज
ती हृदयाची धडकन
ती आधारासाठी घेतलेला हात पट्कन
ती आतुरलेलं एक मन
ती गंधळलेलं बालपण
ती घरातील तळतपी ज्योत
ती हिरकणी, रणरागिणीची द्योत
ती अबला नाही राहिली आता
तिने करून दाखविला चंद्रपर्यतचा प्रवास न थकता
नको बघू कधी तिचे रौद्ररूप
असू देत तिला देवळातील धूप
तिचा श्रुंगार आहे अनेक शब्दांचे आंगण
कितीही महती गायली तरी संपणार नाही शब्दांकण..!
