तिचंच राज्य आहे
तिचंच राज्य आहे
या तारकांच्या जगात सदैव
तिचंच राज्य आहे
माझ्या दीदीचं माझ्यावर
प्रेम अविभाज्य आहे||0||
कोकिळा म्हणतात तिला सर्व
ती माझा अभिमान
तीच संगीताची आशा
या देशाची शान
स्वरसम्राज्ञी किताब ऐसा
तिलाच साज्य आहे
माझ्या दीदीचं माझ्यावर
प्रेम अविभाज्य आहे||1||
दु:खावरती फुंकर घाली
सुखाची छाया
गोडवा दीदीच्या गळ्याचा
स्वरांची माया
या मधुर गोड आवाजासाठी
सर्वच त्याज्य आहे
माझ्या दीदीचं माझ्यावर
प्रेम अविभाज्य आहे||2||
लता ही सात सुरांची
अशीच फुलत राहो
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन हे झुलत राहो
कर्णमधुर हे सूर तिचे ती
फनकार बेताज आहे
माझ्या दीदीचं माझ्यावर
प्रेम अविभाज्य आहे||3||
