तिचं मनात गाव....!
तिचं मनात गाव....!

1 min

185
तिचं मनात गाव,
तिच्या ओठातलं अत्तर..
ती नक्षी हिरवळीत,
अन..वाट टोकदार..! १.
कधी होता प्रीतयोग,
ती स्मित-हास्य देत..
हसते थोडीशी गालात,
अन खुलवते ते खळीत...! २.
हसतात...मग थोड्या सरी,
अन फांद्याही हलतात..
..ती मोहरूनी जाते मग,
झाड निशिगंधाचं होत...! ३.
तिचं गंधर्वनगर...मग,
असं फुलंत...फुलांत..
...ती होते 'परी'च! जणू,
किती निर्मळ! नितळात...! ४.
क्षणात..! तिचं मन फिरतं,
पुन्हा तिच्यातच ते वळतं...
अनेक प्रश्न पांगलेले..
अन्..उत्तर तिच्याकडंच नसतं...,
कारण...,
तिचं मनात गाव,
तिच्या ओठातलं अत्तर....! असतं...!!! ५.