तिची मासीक पाळी
तिची मासीक पाळी
1 min
153
तिची मासीक पाळी
चार दिनांची सोबतीन
महीन्यातून एकदा येणारी
सृजनाचे बीज पेरणारी।
तिची मासीक पाळी
तरूण स्वप्नवत मंतरलेली
आकर्षण निर्माण करणारी
स्त्री देहात गुढ भरणारी।
तिची मासीक पाळी
देवास त्याज्य असणारी
विटाळली जाणारी
अनिष्ट रूढीत अडकलेली।
तिची मासीक पाळी
ममत्वास व्याकुळ झालेली
नरदेहास जन्मास घालणारी
तरीही अपवित्र मानलेली।
तिची मासीक पाळी
