तिचा चेहरा
तिचा चेहरा
1 min
570
तिचा हसतमुख चेहरा
तिच्या मनातील अर्थ
सांगतो गहिरा
कधी दुःखाची सल, कधी सुखाची झलक निर्मळ, चंचल अवखळसा
मनाच प्रतिबिंब दाखविणारा
दुःखातही सुख समाधान बाळगणारा
ओंजळीत आलेल्या
सुखाला गोंजारणारा
जपवणूक नात्यांची नेहमीच करणारा असतो चेहरा सदोदित हसरा
चेहऱ्यावरील भाव तुझे
अनेक टिपतात
तुझ्यावर कथा, कविता लिहितात
तरीसुद्धा थांग लागत नाही स्त्री मनाचा हा दोष तिचा की तिच्या चेहऱ्याचा..
