थंडीचे दिवस
थंडीचे दिवस
1 min
379
गारठलेली ही फूले
रस्त्यावरती बसलेली
एकमेकांना मायेच्या
मिठीत सामवलेली
अनवाणी पायांनी
दारोदार फिरणारी
संपलेला श्वास पुन्हा
नव्याने जागवणारी
व्याकूळलेल्या जीवाला
मायेचा स्पर्शही मिळेना
धुक्यातल्या गार थंडीत
मायेची ऊबही कळेना
देवाघरच्या या फूलांना
आधार मायेचा हवा
चिमुकल्यांना प्रेमाचा
आर्शिवाद तरी द्यावा
