थंडी
थंडी
1 min
378
गार वाऱ्याची झुळूक येता
अंगावरती लव शहारते,
कडाक्याच्या थंडीसोबत
दाट धुक्यांनी पहाट होते
दवबिंदूंचे माणिक मोती
वृक्षवेलींवर कब्जा करती,
अन् वाऱ्याच्या लाटेसरशी
धरणीमाता दवात न्हाती
दाट धुक्यांचे पांढरे शुभ्र
हवेत जणू गालीचे पसरते,
या गालीच्यातून सूर्यकिरण
मोती पावलांनी आगमन करते
जरी नकोशी तरी हवीशी
लपंडाव हा खेळते भारी,
गोड गुलाबी सळसळणारी
मनमोहक ही थंडीच न्यारी
