STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

थंडी बालगीत

थंडी बालगीत

1 min
247

आई मला छानदार

स्वेटर ,मफलर तू दे ना ग

स्वेटर घालीन,शाळेला जाईन

ऐटीत अन रूबाबात छान ग,....


सकाळची गुलाबी,गुलाबी थंडी

संध्याकाळची बोचरी थंडी

आई मला तू उबदार ,देखणी

दे ना ग तू गोंडेदार बंडी.....


गोरे ,गोरे गाल, लाल ओठ माझे

थंडीने किती हाल त्यांचे होतात ग

गाल अन ओठांना लावायला 

मला आई तू व्हँसलीन दे ना ग.....


थंडीमुळे घराबाहेर खेळायला 

मी काही जित नाही ग

तर आई तू मला घरातच

कॅरम खेळायला दे ना ग.....


रात्री मस्त मऊ ब्लँकेट दे

तुझ्या कुशीत मला तू घे ग

गार गार वारा,बोचरी थंडी

पळून जाईल तुझ्या कुशीत आल्यावर ग....,


Rate this content
Log in