थेंबाच वादळ गाताना..
थेंबाच वादळ गाताना..
1 min
337
पाषाणाला तुडवून धावले पाणी
खडकावर आदळले मधे दरीकपारी
बेधुंद वादळ पाण्याचे..........
अडवू शकले नाही कोणी
भेदुन जाताना अंधार
निस्तब्ध गाण्याला वेदनेचा झंकार
नदी ओहळात मिसळताना
सागराच्या बाहुपाशातुनी
मुक्त निर्झर पुन्हा पुण्यअवनी
त्याने साठवले रविकिरण पापणीत
स्थिरावले तरंगात....नि
निजले अंतकरणी
मंद, तरल, गंध...
अनुभव हसले नयनी
वाफाळलेल्या दुःखाला धुडकावत
स्पर्शुन आकाशाला उष्ण वार्यातुनी
मुके शब्द गोठलेले
बरसले श्यामल मेघातुनी
थेंबाच वादळ गाताना
पुन्हा भिडले पाषाणाला पाणी !!!
