STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

थेंब

थेंब

1 min
384

थेंब


कोवळ्या उन्हात 

कोवळे ते पान

पानावर ओघळे

थेंब तो चकाकुन


पक्ष्यांची पिल्ले 

खेळे फांदीवर 

कुतूहले पाहती 

नजर त्या थेंबावर


मनी आनंदती 

मीच आधी पितो

बघ दुसरा थेंब

तुझ्यासाठी ठेवतो


पशु पक्षी मानवा 

साऱ्यांना लागते तहान

उगाचच का म्हणती

जल हेच जिवन


पहिल्या पावसाचा 

आनंद काही औरच 

निसर्ग सारा असा

नवा भासे साराच


साहित्याला गुण द्या
लॉग इन