थेंब थेंब
थेंब थेंब
1 min
60
*थेंब थेंब*
थेंब थेंब तळे साचले
वाफ होऊन हवेत अडकले
त्याचे बनले छान, छान ढग
खोडकर वाऱ्यात ते घुटमळले...
झोके घेता घेता हे ढग
वर वर आभाळात गेले
थंडगार वाऱ्यात सापडले
थेंब होऊन ढगातून बरसले...
पाऊस आहे हा आवडता
रिमझिम रिमझिम नाचू लागला
झाडांना पावसाने कवेत घेतले
लता, वेलींच्या सोबत रमला....
हिरव्यागार रंगाने धरा फुलली
तप्त धरा धारांनी तृप्त झाली
आनंदाने मोहरून आली
मुलांनी नाव पाण्यात सोडली...
*वसुधा वैभव नाईक*
धनकवडी जिल्हा - पुणे*
