थेंब पावसाचा
थेंब पावसाचा
थेंब पावसाचा येतो धावून
पडता जमिनीवर जातो लगेच वाहून
किती हा खेळ सुखदुःखाचा
कधी वाफेत रूपांतर
कधी स्वताचे अस्तित्व संपवण्याचा
येता आनंदाने, अश्रू मात्र जातांना
मात्र विलक्षण आनंद होई चातकास
पहिला थेंब पावसाचा तो पितांना
बळीराजास ही वाटे समाधान
पावसाचे थेंब हाती झेलतांना
थेंब पावसाचा हा काही
क्षण विसावून ओघळून जाणारा
दुसऱ्या थेबांशी कधी एकरूप होणारा
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमकणारा
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा
समुद्रात पडला तर भरती
शिंपल्यात पडला तर मोती होणारा
गडगडत्या ढगातून कधी तहानलेल्या मुखात जाणारा
जिथे जागा मिळेल तिथे घर करून बसणारा
थेंब पावसाचा नितळ,हवाहवासा वाटणारा
वाटते माणसानेही पावसाच्या थेंबा प्रमाणे राहावं
कुठल्या परिस्थिती समाधान मानाव
आपलेपणा मात्र न विसरता निस्वार्थपणे स्वता बरोबर
इतरांना ही आनंदी ठेवावं
