Thanks 2019, Welcome 2020.
Thanks 2019, Welcome 2020.
क्षण तुझे हाती
काळ वेळ, दिवस,
वर्षे तुझे हाती,
Thanks 2019.
येतोस मोहरून,
जातोस निघून,
नसे क्षणाची विश्रांती,
पथिक तू, वेळ तू,
थांबने नाही,
घाईने जाणे नाही,
Thanks 2019.
जन्म कोणचा होतो,
मृत्यू कोणाचा होतो,
निवांत पुढे चालतोस,
वय वर्षे सांगतोस,
Thanks 2019.
कोणी अश्रू वाहती,
कोणाच्या गाली,
गुलाब फुलती,
सुख दुःखाच्या
वेळा पुढे नेशी,
Thanks 2019.
कोणी बोले शुभमंगल,
कोणी बोले रामनाम सत्य,
ही दुनिया चालवितो,
कसा तू, वेळ तू, क्षण तू,
तू 2019, काही तास बाकी,
ओंजळ भर सुखाची,
नको भरु अश्रुंची.
स्वागतला तयार आहे,
2020, हळुवार ये कसा,
दिशा उजळीत ये,
रानफुले हसतील सारी,
ती बघ वेल, किती हिरवी.
Thanks 2019,
Welcome 2020.
