तहानलेला...
तहानलेला...
1 min
184
या पावसाच्या बरसणाऱ्या सरींबरोबर
आज रडावस वाटतंय...
एकामागून एक येणाऱ्या
तुझ्या आठवणींना उधाण आलय म्हणून कदाचित...
बघ ना मातीच्या सुगंधाबरोबर
तुझ्या बद्दलची एक एक आठवण नव्याने आठवून जातीये...
आणि मेघांच्या गडगडाट करणाऱ्या आवाजामध्ये
नकळत फुटलेला हंबरडा सुद्धा विलीन होऊन जातोय..
पावसाच्या सरी सारखीच
तुही धो-धो बरसून निघूनही गेलीस...
मागे काहीच न ठेवता..
आणि मी.... मी मात्र तसाच
तहानलेला..
