STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

थांब जरासा मनुजा

थांब जरासा मनुजा

1 min
249

अर्थामागे धावे मनू

गती असे वेगवान

थांब जरासा मनुजा

नको होऊस बेभान


कष्ट त्याग मेहनत

त्रिसूत्रीच जीवनाची

नको धावू अर्थामागे

ठेव जाण भावनांची


घरी मुले आसावली

माया प्रेम वात्सल्यासी

आई बाबा मुले पत्नी 

न्याय दे तू सकलांसी


अर्थ हेच जीवनाचे

ध्येय नकोस बाळगू

कांचनसंध्येला कोणी

यावे प्रेमाने बिलगू


काळ जातो वेगेवेगे

नित्य सदा पुढे पुढे

जीवनाचे मर्म जाण

आता तरी सूज्ञपणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन