तगमग...
तगमग...
तगमग या मनाची तू जाणशील का ?
तुझ्याशीवाय मला अर्थ नाही मानशील का ?...
काळ्या डोळयांमागे जेव्हा अंधार दाटतो ,
तूच असतो सोबतीला चालत जाणशील का?...
चांदणे हसते जेव्हा तुझ्या मुखी गोड प्रिया,
तुझ्याशिवाय तारांगणे ही फिकी मानशील का?...
प्रित पिवळ्या सोन्यांची नक्षी करून घेतली,
तूलाच चढविले अलंकारात जाणशील का?...
हिरवागार बहरलां तो स्वप्नांचा बगीचा ,
हात घेऊन माझा सवे मोगर्यापरी दरवळशील का?...
मोती रोमरोमी बहरले झळाळी तनुवर आली ,
पांघरून ही झळाळी स्वप्न माझे पाहशील का?...
गुलाबाने रंग सजले जीवन रंगीत झाले माझे,
रंगलेल्या पाऊलवाटा माझ्या वाटे सवे चालशील का?...
