STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

तग धरून

तग धरून

1 min
350

आर्थिक मंदीत दिव्य समोर ठाकत

आहे तो जॉब न सोडण्याचे


तासा तासाला रोज नवीन बातम्या

मन बैचेन करणाऱ्या असतात


आजूबाजूला बसणाऱ्यातील कोणी न दिसल्यास

शंकांनी कुजबुज सुरू होते सर्वांची


येणाऱ्या त्या नकोश्या लाटा परतवुन लावायच्या

आहे त्याच ठिकाणी तग धरून घट्ट पाय रोवायचे


हुमन रिसोर्सवाल्याचे उद्धटासारखे बोलणे

ऐकण्या समोर जायचे


येणाऱ्या संकटांना धीराने तोंड द्यायचे

'ऊतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको' ह्याच न्यायाने वागायच


Rate this content
Log in